महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
नागपूर- वाळू तस्करी रोखण्याबाबत शासनाने विविध योजना राबविल्या असून लवकरच राज्यस्तरीय भरारी पथक निर्माण करण्याचा विचार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवेढा तालुक्यातील माण व भीमा नदी पात्रातून अवैधरित्या होत असलेल्या वाळू उपसाबाबतचा प्रश्न विचारला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत श्री. पाटील यांनी उपरोक्त माहिती दिली. श्री. पाटील म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील 9 लाख ब्रास वाळू शासकीय कामांसाठी होती. तथापि संबधितांनी ती उचलली नाही. त्यासाठी तातडीने निविदा मागविल्या जातील. अवैद्य वाळू उपसा संदर्भात978 प्रकरणात 10 कोटी 81 लाख रुपये दंड वसूल केला आहे तसेच 582 गुन्हे नोंद असून 87 लोकांना अटक करण्यात आली आहे. अवैध वाळूसंदर्भात शासन कडक कार्यवाही करत आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत महसूल राज्यमंत्री संजय राठोड, सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, अजित पवार,प्रकाश सुर्वे, शरद सोनवणे आदींनी सहभाग घेतला.