जळगाव। जिल्ह्यात मोठ्या गुन्ह्याचे प्रमाण वाढत असुन महसुल विभागाने गुन्हे दाखल करून दंड वसुल करूनही वाळु चोरीचे गुन्हांत प्रतिबंध होत नसल्याने जिल्हा पोलिस दलाने सागर मोतीलाल चौधरी याच्याविरूध्द जिल्हाधिकार्याकडे एमपीडी अतर्गत कारवाई करून त्याला अटक करून नाशिक जेल येथे रवाना केले. या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली असून वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.
विविध गुन्हे दाखल : जिल्ह्यातील अवैध कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पोलिस दलाचे पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, यांच्या सुचनेवरून वाळूमाफीयांची माहिती गोळा केली. यात वाळूमाफिया म्हणून ओळख निर्माण करणारा सागर मोतीलाल चौधरी याच्याविरूध्द शहर पोलिस ठाण्यात भाग 5, गुरन 141/2015 कलम 354 विनयभंग, जिल्हा पेठ पोलिसात अत्यावश्यक वस्तु कायदा कलम अधिनियमाखाली गुरन35/2006,12/2006 व अदखलपात्र स्वरूपाचे रजि क्रमांक 655/2014,108/2014, 87/2014 कलम 504,506 असे गुन्हे दाखल आहे, असल्याचे निदर्शनास आले.
प्रस्तावाला मंजुरी
सागर चौधरी याने अनेकदा दंड होऊनही अवैध मार्गान वाळुचोरीचा व्यवसाय सुरू ठेवला.शासकीय अधिकार्यांनाही जेरीस आणले होते.निवासी जिल्हाधिकारी राहुल मुंडके यानीं पडताळणी करून जिल्हाधिकारी किशोर राजेनिबांळकर यांनी चौकशीअंती स्थानबध्दतेचा आदेश पारित केला एलसीबी पोनि चंदेल व सहकार्यांनी सागर चौधरीला अटक केली आहे.