पाचोरा । जिल्ह्याभरात वैध अवैध मार्गान मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. जिल्ह्यात अशरशः वाळू माफीयांनी धुमाकुळ घातले आहे. पाचोरा व एरंडोल तालुक्यातील माहेजी व हनुमंतखेडा या ठिकाणाहून चोरटी वाळू वाहतुक होत आहे. वाळू माफीयांनी गिरणामाईचे वस्त्र हरण केले आहे. जिल्ह्यात पाऊस लांबल्याने तर वाळू वाहतुकदाराचे फावले आहे. दरम्यान वाळू चोरी रोखणार्या मंडळ अधिकार्यांला धक्काबुक्की करीत लोखंडी सळी उगाळल्याची घटना घडली आहे.
माहेजी-नांद्रा रोडवर ही घटना घडली अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली असून वाहने जप्त करण्यात आली आहे. नांद्रा-माहेजी रोडवर गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी मंडळ अधिकारी रमेश मोरे यांना कळविली. मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी आले. त्यावेळी अवैध वाळू वाहतूक करणारे प्रवीण राजाराम पाटील, संदीप राजाराम पाटील, रघुनाथ पाटील यांच्यासह चार जणांनी मोरे यांच्याशी वाद घातला. प्रवीण पाटील याने मोरे यांच्या अंगावर धावत जावून लोखंडी सळी उगारल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर जप्त केले. 379 प्रमाणे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप पाटील तपास करीत आहेत.