यावल शहरातील घटना ; उपद्रवींचा बंदोबस्त करण्याची मागणी
यावल- तालुक्यातील अंजाळे येथे वाळू वाहतुकीला सतत अडथळा निर्माण करण्याचा संशय घेेत एका वाळू वाहतुकदारांनेे सेवानिवृत्त कोतवालास मारहाण केल्यानेे खळबळ उडाली आहे तर संबधीताने सरपंचा मनिषा सपकाळे यांनादेखील शिवीगाळ केल्याने या प्रकरणी यावल पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सेवा निवृत्त कोतवाल पंडीत काशिनाथ कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गावातील बुध्द विहारातुन वाळू नेण्या करीता संशयीत आरोपी भगवान प्रकाश सपकाळे हा गेला होता मात्र त्यास भन्तेजीनी वाळू उचल करण्यास नकार दिला तेव्हा संशयीत सपकाळे याने दारू पिऊन येत गावातील तलाठी कार्यालयाजवळ धिंगाणा घातला व तेथे असलेले सेवानिवृत्त कोतवाल पंडीत कोळी यांना तुम्हीचं मला अवैद्य वाळू वाहतुकीस नेहमी अडथळा आणतात, असे सांगत हुज्जत घातली व त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच दारूच्या नशेत संबधीतानेे सरपंच मनीषा सपकाळे यांनादेेखील शिविगाळ केली तर या प्रकरणी कोळी यांनी यावल पोलिस ठाणे गाठले व तेथुन पोलिसांनी संशयीताच्या शोधात पोलिस पथक देखील पाठवले मात्र तो मिळून आला नाही या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैद्य वाळू वाहतुकदारांची दंबगगिरी
गावात अनेक जणं अवैधरीरत्या वाळू वाहतूक करतात तर जर कुणी पकडले गेले तर ते नेहमीच सेवानिवृत्त कोळींसह गावातील नागरीकांना दादागिरी दाखवुन तुम्ही खबरे आहेत का? असे म्हणत सतत वाद घालत असतात तेव्हा यांचा बंदोबस्त व्हावा असे सरपंच मनिषा सपकाळे यांनी सांगितले.