जामनेर- तालुक्यातील ओझर गावाजवळील नदीपात्रातून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर उलटून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास घडली. पिंटू मोरे रा.ओझर, असे मृत चालकाचे नाव आहे. दरम्यान, अवैधरित्या ही वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती आहे. आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास पिंटू मोरे ही वाहतूक करीत असतना नदीपात्रातील चढतीवरून ट्रॅक्टर रिव्हर्स आल्याने उलटून त्याखाली दबला गेल्याने पिंटू मोरेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेच्या पंचनाम्यासाठी पोलीस कर्मचारी घटनास्थळाकडे रवाना झालेले आहे.
सविस्तर वृत्त अंकात