वाळू वाहतूकदार संघटनेने सहकार मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत सोडले उपोषण

0

जळगाव । गेल्या अनेक दिवसा पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसलेल्या वाळू वाहतूकदार संघटनेने अखेर सहकारमंत्री गुलाबराव पाटील तसेच आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थिती मध्ये निंबू सरबत घेऊन उपोषण सोडले आहे. यावेळी ना पाटील यांनी उपोषणकर्त्याना प्रशासनाच्या मध्यस्ती करून जे निर्बंध घालण्यात आले आहे याबाबत चर्चा करण्यात येईल. जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या सोबत बोलून मागण्या तसेच आठवड्या भरात समस्या सोडविण्याचे उपोषणकर्त्याना देण्यात आले यावेळी विठ्ठल पाटील, बाबू पटेल, सुधाकर नेवरे यांनी उपोषण सोडले, विठ्ठल पाटील, बाबु पटेल, सुधाकर नेवरे,रवि सपकाळे, अमित बच्छाव, संजय ढेकळे, दिपक चौधरी,आनंद सपकाळे, भिकन नन्नवरे, सुपडू सोनवणे, नंदू हटकर, दगडू सपकाळे, चंद्रकांत चौधरी, दिपक वारुळे, मनिष कोल्हे, गनि पटेल, रहिन काझी आदी उपस्थित होते.