जळगाव । तालुका प्रांताधिकारी यांच्या पथकाने आज शहरातील 19 वाळू वाहतूक करणार्या वाहनांवर अचानकपणे सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कारवाई करण्यात आली. या कारवाईत एक जण मात्र पळ काढण्यात यशस्वी झाला आहे. कारवाई केलेल्या वाहनांमध्य 10 डंपर व 9 ट्रक्टर यांचा समावेश आहे. अशी माहिती प्रांताधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले. सदरील कारवाई नेमून दिलेला गट सोडून इतर गटात वाळू उपसा करणे व दिलेल्या पावत्यांवर खोडाखोड करत करत असल्याचे आढळून आल्याने या वाहनांवर करवाई करण्यात आली.
बांभोरी परीसरातील नदी पत्रात यात्रेचे स्वरूप
जिल्हाधिकार किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात समती पथक तयार करण्यात आले होते. या पथकात प्रांताधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळाधिकारी, तलाठी यांचा समावेश असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अवैध रित्या वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याचे जिल्हा प्रशासनाला माहिती मिळली होती. या ठेका देवूनही अवैध रित्या वाळूची वाहतूक का होत आहे असा प्रश्न सर्व सामन्यांमध्ये होत होता. प्रांतधिकारी यांच्या कारवाईत तपासणी केली असता वाळू ठेकेदार हे नेमून दिलेला वाळूचा ठेका सोडून इतर ठिकाणी वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा करीत होते. त्याचप्रमाणे पावती बरोबर नाही, दिलेल्या पावत्यांवर खाडाखोड असल्याचे निदर्शनास मिळून आले. बांभोरी परीसरातील पुलाच्या दोन्ही भागातील नदी पात्रात डंपर व ट्रक्टर यांना जत्रेचे स्वरून आले असून दिलेल्या ठेकापेक्षा अधिक प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याचे दिसून आले.
चौकशी करून कारवाई
इ टेन्डर नुसार जो गट दिला गेला आहे तो गट सोडून इतर भागात मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा करत आहे व पावत्यांमध्येही मोठा घोळ असल्यामुळे ही धडक कारवाई केली आहे. लवकरच याची चौकशी केली जाणार असून सदोष आढळून आल्यास वाळू ठेकेदारांकडून वाहन जप्त करून कडक कारवाई करणार आहे. – जलज शर्मा, प्राताधिकारी
यांनी केली कारवाई
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी जलज शर्मा, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, तालुका पोलिस स्टेशनचे सपोनि सागर शिंपी यांच्यासह तलाठी, मंडळाधिकारी, तहसिलदार यांनी कारवाई केली.