वावरिंका उपांत्य फेरीत, व्हीनस स्पर्धेतून बाहेर

0

इंडियन वेल्स । शुक्रवारी इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेची स्विसच्या स्टॅनलिस वावरिंकाने रोमहर्षक विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. दुसरीकडे माजी नंबर वन व्हीनसचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. एलेनाने महिला एकेरीच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. वावरिंकाने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात तीन सेटपर्यंत शर्थीची झुंज द्यावी लागली. डोमिनिक थिएमचा पराभवे 6-4, 4-6, 7-6 अशा फरकाने रोमहर्षक विजय संपादन केला. यात सरस खेळी करताना त्याने सामना जिंकला.31 वर्षीय वावरिंकाने दोन तास 31 मिनिटे झुंज देऊन थिएमला धूळ चारली. त्याने सामन्यादरम्यान 11 पैकी 8 ब्रेक पॉइंट वाचवले.तसेच दुसरा सेट गमावल्यानंतर त्याने तिसर्‍या आणि निर्णायक सेटमध्ये आघाडी मिळवली. हीच लय कायम ठेवताना त्याने यात बाजी मारू न सामना आपल्या नावे केला. त्यामुळे थिएम बाहेर पडला.

वावरिंका-पाब्लो झुंजणार
वावरिंकाने पहिल्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. आता त्याचा उपांत्य सामना 21 व्या मानांकित पाब्लोे कारिनो बुस्ताशी होईल. पाब्लोने उपांत्यपूर्व लढतीत उरुग्वेच्या क्युवासवर 6-1, 3-6, 7-6 ने विजय संपादन केला. रशियाच्या एलेना वेस्निनाने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात माजी नंबर वन व्हीनसचा पराभव केला. तिने 6-2, 4-6,6-3 ने सामना जिंकला. आता विम्बल्डनच्या सेमीफायनलिस्ट वेस्निनाला किताबाची संधी आहे. तिने दोन तास 11 मिनिटांत व्हीनसला बाहेरचा रस्ता दाखवला.