वासखेडी गावात दारू बंदीसाठी एल्गार

0

निजामपूर । साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील वासखेडी गावात अवैध धंदे व बेकायदेशीर दारू विक्री विरोधात वासखेडी येथील सामाजिक कार्यकर्ते नंदु नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावात मोर्चा काढण्यात आला. यावेळी गावकरी, महिला, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभाग झाले होते. वासखेडी गावात बेकायदेशीर दारू व अवैध धंदे सुरू आहे. विक्रीसाठी बाहेर गावाहुन बेकायदेशीर दारू आणुन गावात विक्री होते. यामुळे गावात अल्पवयीन मुले व्यसनी झाले आहेत. दररोज मोठ्या संख्येने लोक गावात सकाळी व संध्याकाळी दारू पिऊन आले की गावात दररोज भांडण वादविवाद होत असतात.

अवैध धंद्याविरूद्ध काढला मोर्चा
गावात दररोज सायंकाळी दारू पिऊन आलेले मुलांना व पतीना सांभाळ यांची वेळ महिलांवर आली आहे. दारूमुळे कुटुंबात वादविवाद ,भांडण होत असतात. याचा लहान मुलांवर वाईट परिणाम होत आहे. सायंकाळी मुलांना अभ्यासाच्या वेळेत दारूमुळे भांडण होत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार करुनही पोलीस कर्मचारी लक्ष देत नाही असे पत्रकात आरोप करण्यात आला आहे. गावातील महिला, पुरूष, शिक्षक व लहान मुलांनी एकत्र येऊन गावात संपुर्ण अवैध धंदे व बेकायदेशीर दारू विकी बंद करण्यात यावी यासाठी मोर्चा काढला. निजामपुर पोलीस स्टेशन तहसीलदार, जिल्हाअधिकारी, पालकमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.