वासवानी, तलरेजा यांनी स्विकारली पदांची सुत्रे

0

जळगाव । येथील एकता सिंधी महिला मंडळाचा पदग्रहण सोहळा मंगळवारी संत श्री झुलेलाल सभागृहात थाटात संपन्न झाला. नूतन अध्यक्षा गीता वासवानी यांना मावळत्या अध्यक्षा जयश्री आयदासानी यांनी तर उपाध्यक्षा किरण तलरेजा यांना मावळत्या उपाध्यक्षा रेखा आयदासानी यांनी पदाची सुत्रे प्रदान केली. यानंतर अध्यक्षा वासवानी यांनी नूतन कार्यकारिणी जाहिर केली. त्यात भावना टेकवाणी, शोभा रंगलानीे, हिरू चेलानी, जयश्री आयदासनी, रेखा आयदासानी आदिंचा समावेश आहे.

देहदान एक श्रेष्ठ दान विषयावर मार्गदर्शन
जयश्री आयदासानी यांनी केलेल्या कार्याचा आढावा तर गीता वासवानी नवीन वर्षातील कार्याचा संकल्प आपल्या मनोगतात व्यक्त केला. याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ.प्रभु व्यास यांनी देहदान एक श्रेष्ठ दान या विषयावर मार्गदर्शन केले. देहदान केल्यास वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यास व संशोधनासाठी ते फार मोलाचे ठरते असे सांगून रक्तदान, नेत्रदान व अवयवदानाची थोडक्यात माहिती दिली. प्रारंभी दीप प्रज्वलन, संत झुलेलाल प्रतिमा पूजन आणि गायत्री व वेदमंत्रा सादर करण्यात आले. सुत्रसंचालन व आभार हिरू चेलानी यांनी तर परिचय किरण पोपटानी यांनी करून दिला. कार्यक्रमास महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.