वासिंदमध्ये संविधान दिवस उत्साहात

0

वासिंद । आरपीआय (अ) वासिंद शहर व विभागाच्या वतीने आरपीआय कार्यालयात संविधान दिवस साजरा झाला. वासिंद पोलीस ठाण्याचे अजय शेटे, संदीप जाधव व तालुका युवा अध्यक्ष विकास निकम, उद्योजक मनीष अहीर यांनी राष्ट्रीय महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला म.प्र.सहसचिव बाळकृष्ण गायकवाड, जिल्हा संघटक सचिव आत्माराम पगारे यांनी पुष्पहार अर्पण केला. अनिल साळवे यांनी संविधान प्रतीचे वाचन केले.

शहिदांना वाहिली श्रद्धांजली
विद्यार्थी अध्यक्ष नरेंद्र कोचूरे, शहर अध्यक्ष प्रवीण गायकवाड, युवा अध्यक्ष राहुल दोंदे, विद्यार्थी उपाध्यक्ष अमोल गायकवाड, कार्याध्यक्ष अनिल साळवे, राजेश निकम, संजय सुरळके, आयुब शेख, देवीदास जगताप, सचिन रोकडे, मनोज सुरळके, मंगेश जगताप, प्रदीप जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सचिन जाधव व सुनील जगताप यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून भारतीयांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी 26/11च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.