वासिंद । वासिंद ग्रामपंचायत उपसरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेना-आरपीआय युतीच्या उमेदवार आरपीआयच्या रिना राजेश सोनावणे या वासिंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या आहेत. वासिंद ग्रामपंचायतीची निवडणूक शिवसेना-आरपीआय पक्षाच्या युतीने लढवली होती. त्यावेळी आरपीआयला उपसरपंच पद देऊ असा शब्द शिवसेना पदाधिकार्यांनी आरपीआय पक्षाच्या पदाधिकार्यांना दिला होता. आज हा शब्द शिवसेनेने पाळला असल्याची भावना आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड यांनी व्यक्त केली. तसेच शिवसेना दिलेला शब्द पाळते असे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बंडू शृंगारपूरे व तालुका कार्यकारिणी सदस्य दत्तात्रय ठाकरे यांनी सांगितले. वासिंद ग्रामपंचायतीच्या गेल्या 67 वर्षांत प्रथमच आरपीआय पक्षाला उपसरपंच पदाचा मान मिळाला आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना शहापूर- कल्याण तालुकासंपर्क प्रमुख विठ्ठल भेरे, उपतालुका प्रमुख बंडू शृंगारपूरे व मधुकर गायकर, सरपंच राजेंद्र म्हस्कर, माजी उपसरपंच सागर कंठे, तालुका कार्यकारिणी सदस्य दत्तात्रय ठाकरे, विभागप्रमुख गुरूनाथ ठाकरे, ग्रा.वि.प्रमुख बाळाराम तरणे, शहरप्रमुख प्रफुल्ल पांडव, मोतीराम ठाकरे, संतोष शेलार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आरपीआय पक्षाचे प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड, जिल्हा सहसचिव आत्माराम पगारे, उपजिल्हाध्यक्ष विनोद थोरात, तालुकाध्यक्ष जयवंत थोरात, उपतालुकाध्यक्ष सचिन जाधव, शहर अध्यक्ष प्रवीण गायकवाड, युवा अध्यक्ष राहुल दोंदे, बबन गायकवाड, कसारा विभाग अध्यक्ष देवीदास भोईर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.