मुंबई । निवडणुका आल्या की प्रचाराची रणधुमाळीला तोंड फुटतो,यात उमेदवार आपला प्रचारासाठी अनेक हातखंडे वापरतात. मुंबई पालिकेच्या निवडणुकीत वासुदेव अवतरले आहे.वासुदेव हा नागरिकांच्या जिव्हाळाचा विषय आहे.ग्रामिण भागात आजही वासुदेवाच्या टाळांनी सकाळ होते.सकाळी सकाळी वासुदेव आपल्या ओवीतून ग्रामस्थांना जाग आणून त्यांच्या आनंदी जिवनासाठी कामना करित असतो. वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पाहरी वासुदेव असे ओव्या म्हणून ग्रामस्थांना व घरोघरी जावून दान मागत असतात.या वासुदेव व ग्रामस्थांचे एक जिव्हाचे नाते असतो.त्या नात्याला एक मायेचा ओलावा असतो. तोच वासुदेव आपल्या चिपडे घेवून मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
प्रचाराचे हटके फंडे
शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचाराचे हटके फंडे अवलंबायला सुरुवात केली आहे. शिवसेनेने प्रचारासाठी थेट वासुदेवालाच साकडे घातले आहे.घाटकोपरमध्ये शिवसेनेकडून उमेदवार सुरेश पाटील महापालिका निवडणुकांच्या रिंगणात आहेत. सुरेश पाटील यांनी प्रचाराच्या आखाड्यात थेट वासुदेवालाच उतरवले आहे. त्यासाठी खास बारामतीहून वासुदेवांना पाचारण करण्यात आले आहे. कोणतेही मानधन न घेता पारंपरिक वेशात वासूदेव प्रचार करीत आहेत.