वासुदेव इंगळे यांच्या अडचणीत वाढ ः आर्थिक गुन्हे शाखेने कलम वाढवले

0
भुसावळ- श्री संतोषी माता मर्चंटण को.ऑप के्रडीट सोसायटीचे चेअरमन वासुदेव आनंदा इंगळे, वसुली अधिकारी प्रशांत भारंबे, सहाय्यक निबंधक गिरधर फुलाजी अहिरे यांच्याविरुद्ध बनावट 101 दाखला बनवून 50 लाख 12 हजार 386 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुरुवातीला बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र अपहाराची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा अधिक तपासासाठी जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. आर्थिक शाखेने शनिवार, 29 रोजी भादंवि 409, 406, 420 व एमपीआयडी अ‍ॅक्ट (महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3) हे जादा कलम वाढवल्याने आरोपींच्या अडचणीत वाढ झाल्याचे तक्रारदार रवींद्र नारायण भोळे यांनी कळवले आहे. यापूर्वी इंगळे यांच्यासह इतरांना न्यायालयाने जामीन नाकारला आहे.