वासुली-सुदुंब्रे रस्त्यासाठी निधी!

0

वासुली ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकासकामांचे थाटात उद्घाटन

वासुली । ग्रामीण भागातील नागरिकांसाठी रस्त्याअभावी कोणत्याही गैरसोयीला तोंड द्यावे लागू नये, हा आपला उद्देश आहे. त्यामुळे वासुली व सुदुंब्रे रस्त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुमारे 40 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील तसेच वासुली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुरेश पिंगळे यांनी सांगितलेल्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांनी दिली. वासुली (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी मनोगत व्यक्त करताना देवकाते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील होते.

केवळ विरोधासाठी विरोध नको
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना शरद बुट्टे पाटील म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विकासाच्या योजना राबविताना पक्षीय जोडे बाहेर ठेऊन सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. केवळ विरोधाला विरोध न करता विकासकामांबाबत स्पर्धा व्हायला हवी. इतरांसारखे नारळ फोडून नुसती भूमिपूजने न करता आम्ही प्रत्यक्ष कामे करून त्यांची उद्घाटने करतो, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांची माहिती
वासुली ग्रामपंचायतीच्या सरपंच इंदुबाई शेळके व उपसरपंच सुरेश पिंगळे यांनी गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. ऑगस्ट 2015 ते ऑगस्ट 2017 या कालावधीत वासुली ग्रामपंचायत हद्दीतील एमआयडीसी अंतर्गत येणार्‍या कंपन्यांकडून कर स्वरुपात येणारी रक्कम त्यांनी विकासकामांसाठी खर्च केली आहे. नागरिकांच्या प्राथमिक गरजा असलेल्या रस्ते, पाणी, पथदिवे, स्वच्छता यांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. वासुली गावठाण, भामचंद्रनगर तसेच गावातील वस्त्यांमध्ये अंतर्गत रस्ते, काँक्रिटीकरण यासाठी सुमारे एक कोटी 60 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. वाडीवस्तीसह संपूर्ण गावात 23 लाख रुपये खर्चून पथदिव्यांची कामे केली. त्याचप्रमाणे अंगणवाडी इमारत, दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत सिमेंट रस्ता, आरसीसी स्मशानभूमी, अशी कामेदेखील जि.प. सदस्य शरद बुट्टे पाटील व सुरेखा ठाकर यांच्या माध्यमातून केली आहेत. भामचंद्रनगरात 60 लाख रुपये किंमतीची शाळेची इमारतदेखील बांधण्यात आली आहे. याकामी उपसरपं पिंगळे व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ता घुले यांची विशेष परिश्रम घेतले. शालेय इमारत सुशोभिकरण व संरक्षण कामासाठी ग्रामपंचायतीने 10 लाखांचा निधी खर्च केला. दोन वर्षाच्या काळात दोन कोटी 75 लाख रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत.

विकासकामांसाठी यांचे लाभले सहकार्य
गावात विविध विकासकामे करण्यासाठी सरपंच इंदुबाई शेळके, सचिन पाचपुते, कांताबाई गावडे, विनोद पाचपुते, पुष्पा पाचपुते, छाया जांभळे व ग्रामसेवक सुभाष धोत्रे यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे उपसरपंच सुरेश पिंगळे यांनी सांगितले. या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती, भामचंद्रनगर व ग्रामस्थांच्या वतीने माजी मुख्याध्याध्यापक बापूसाहेब सोनावणे, सरपंच इंदुबाई शेळके व उपसरपंच सुरेश पिंगळे यांचा कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

संयोजनात यांचा हातभार
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशाल शेळके, संतोष घुले, तानाजी तोंडे, सुभाष भोरे, योगेश घुले, गोपाल दळवी, अंकुश पिंगळे, महादेव शेळके, आकाश शेळके, सोमनाथ शेळके, खंडू निकम, माऊली जांभूळकर, श्रीपती पिंगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका वाघ, कोकणे, प्रदीप घुले, सुरेश गावडे, सचिन इंगळे, सारिका शेळके, कावरे यांची सहकार्य केले. खेडचे भाजप तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईनाथ घाटे यांनी केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, गट शिक्षणाधिकारी सोपानराव वेताळ, बांधकाम विभागाचे उपभियंता सुरेश कानडे, संजय मिस्त्री, सीतारमण, पं. स. सदस्य चांगदेव शिवेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, अंगणवाडी पर्यवेक्षिका कुलकर्णी, विस्तार अधिकारी पाटील, शिनगारे, रत्ना पिंगळे, मनीषा शेळके, पूजा घुले, शिंदे, केंद्रप्रमुख कांबळे, घाडघे, उद्योजक बाळासाहेब गवारे, अमोल झेंडे, सरपंच दत्ता मांडेकर, गणेश पवार, नवनाथ काळे, शिवाजी डावरे, मोहन पवार, सागर आंद्रे, प्रकाश दोंद, संजय चौधरी, बाजीराव हंबीर, प्रदीप नवरे, सुनील देवकर, दत्ता टेमगिरे, अमोल पाचपुते, मालक पाचपुते, शिवाजी कावरे, चंद्रकांत कावरे, वसंतआणा पाचपुते, सोपान पाचपुते, माणिक पाचपुते, भगवान पाचपुते, मोहन पाचपुते, अंकुश शेळके, हनुमंत दळवी उपस्थित होते.