लोणावळा : लोणावळ्यातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जास्तीचे अधिकारी आणि कर्मचारी नेमून स्वतंत्र वाहतूक विभाग सुरू करू तसेच वर्षा ऋतूमध्ये येणार्या लाखो पर्यटकांची कोंडी होऊ नये म्हणून नगरपरिषदेच्या सहकार्याने पार्किंग व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिले.
लोणावळा आणि चार पोलिस स्टेशन परिसरातील संस्था आणि नागरिक यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर चर्चा करताना विश्वास नांगरे पाटील बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलिस डी. डी. शिवथरे, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पोलिस कर्मचार्यांसाठी शंभर अत्याधुनिक क्वार्टर बांधणार
नांगरे पाटील म्हणाले, लोणावळा महागडे शहर असून पोलिस अधिकारी, कर्मचारी येथे यायला कंटाळा करतात, त्यांची रहाण्याची सोय म्हणून शंभर अत्याधुनिक क्वार्टर बांधण्यात येतील. नगरपरिषदेच्या नगरसेवक, नगरसेविका आणि हाटेल, चिक्की व्यसायिक यांचे सहकार्यातून शहरातील गजबजलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवल्यास चोर्या आणि गुन्हे लवकर उघडकीस येतील, असेही त्यांनी सांगितले. तरूण मुले मोटारसायकल स्टंटबाजी करून जीवाला मुकतात. यावर उपाय म्हणून असे अपघातात मृत्यू पावलेल्या तरूणांचे व्हिडिओ स्टंटबाजी करणार्या तरूणांना दाखवून जनजागृती करणे शक्य आहे.
प्रत्येक प्रभागात सीसीटीव्ही कॅमेर बसविणार
पुणे जिल्ह्याचे पोलिस निरीक्षक सुवेझ हक म्हणाले, ‘प्रत्येक माणसात एक पोलिस दडलेला आहे. सर्वांसाठी सर्वांनी जबाबदारी घ्यावी. नवीन पोलिस भरती झालेेल्या कर्मचार्यांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लोणावळ्याच्या व्यवस्थेकरीता पाठवू. शहरात प्रत्येक प्रभागात मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, पार्किंगची सोय, रस्ता झालेल्या ठिकाणी पांढरे पट्टे मारण्यात येईल,’ असे नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले.
राजकीय नेते, नागरिक, पत्रकार आदींनी वाचला समस्याचा पाढा
यावेळी पत्रकार विशाल पाडाळे यांनी राजमाची गाव लोणावळा हद्दीत घेण्याची सूचना केली ती मंजूर करण्यात आली. पाण्याचे टँकरमुळे अपघातात वाढ होते’ असे उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांची सुचना मान्य करून कार्यवाही करण्यात येईल, असे नांगरे पाटील म्हणाले.
किसन परदेशी, ‘सादिक बंगाली असे क्रीमिनल गुन्हेगार येथे तयार होतात. रेव्ह पार्टीचे कार्यक्रम होतात त्यावर धाडी टाकल्या आहेत. गर्दुल्यांचा ञास होतो.’ महिलांची छेड काढली जाते’ अशा तक्रारी वाढल्या असे नगरसेविका आरोही तळेगांवकर यांनी सांगितले. त्यावर कडक कारवाईचा इशारा नांगरे पाटील यांनी दिला. आर.पी.आयचे नगरसेवक दिलीप दामोदरे म्हणाले, चौकात अधिकारी येताच पोलिस हजर असतात’; परंतु नंतर निघून जातात. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष बी.बी.पाटील यांनी वीस बॅरिकेट देण्याचे आश्वासन दिले. माजी नगरसेविका शीला बनकर यांनी पांगशे चाळी लगत रस्ता रूंदीकरण करून पालिकेने चांगले काम केले, परंतु मधोमध विजेचा खांब काढावा, असे सांगितले. तर नगरसेवक व लोणावळा पञकार संघाचे अध्यक्ष निखिल कविश्वर यांनी वाहातूक कोंडी, पार्कींग समस्या सोडविण्यात याव्या अशी मागणी केली त्यावर नगरपरिषदेच्या वतीने जागा उपलब्ध झाल्यास प्रश्न मार्गी लागेल. आणखी दहा पोलिस आणि ट्रॅफीक वार्डन वाढविण्यासाठी आदेश देतो, असे पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी सांगितले.
एकवीरा गड पायथा येथे पोलिस चौकी करण्याची मागणी
एकवीरा गड पायथा येथे पोलिस चौकी कार्यान्वित करावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तानाजी पडवळ यांनी सुचविले. शिक्षण मंडळाचे माजी सभापती संजय अडसुळे यांनी प्रत्येक चौकात जादा पोलिस वाढवून सीसीटीव्ही कमेरे बसवावेत असे सुचविले. माजी नगरसेविका यमुना साळवे, लायन्स क्लब सुप्रिमोचे सचिव राजेस अगरवाल, सिंहगड टेक्निकलचे प्राचार्य गायकवाड, कार्लाचे पोलिस पाटील संजय जाधव, पत्रकार प्रशांत पुराणिक यांनी वाहतूक समस्या सोडविण्यात पोलिस आणि पालिकेने भूमिका बजावावी असे सुचविले.
पालिकेने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात
पत्रकार मच्छिंद्र मांडेकर यांनी औंढे खुर्दचे माजी सरपंच नितीन खाडे यांच्या खून प्रकरणी तीन आरोपी अटक; तर तीन फरारी आरोपींना कधी अटक होईल या प्रश्नावर नांगरे पाटील यांनी तपासात हयगय केली जाणार नाही असे सांगितले. यावेळी प्रास्ताविकात पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी पावसाळ्यात वाहतुकीसंदर्भात समस्यांचे निराकरणासाठी अपुरे पोलिस कर्मचारी असतात असे सांगून पालिकेने पार्कींग करीता मोकळ्या जागा उपलब्ध कराव्यात असे सुचविले. वलवण आणि खंडाळा या मार्गावर दिवसा द्रुतगती मार्गावरून जड वाहने सोडविण्यात येतील. टोलमधे सवलती मिळावी अशी वाहतूकदारांची समस्या सोडविण्यात यावी असे सांगितले. गुरूकूलच्या विद्यार्थ्यानी व श्रेया सूर्यवंशी यांनी पोलिस खात्याने विद्यार्थ्यांना वक्तृत्वाची संधी दिल्याबद्दल आभार मानले.