शिवाजी चौकात सकाळपासून जोरात कारवाई
हिंजवडी : हिंजवडीतील वाहतुकीला अडथळा ठरणार्या हिंजवडीतील रस्त्यांवरील टपर्यांवर पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए)ने हातोडा चालविला आहे. आज (शनिवारी) सकाळी साडेआठ वाजल्यापासून रस्त्यावरील टप-यांवर कारवाई करत रस्ता मोकळा केला जात आहे. हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सध्या चर्चेत आहे. वाहतूक कोंडीवर पर्याय काढण्यासाठी विविध प्रयोग केले जात असून त्यासाठी पोलिसांनी एकेरी वाहतूक देखील सुरु केली आहे. रस्त्यावरील टपर्यांमुळे देखील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
हे देखील वाचा
चौकात जोरदार कारवाई
हिंजवडीमध्ये आयटी कंपन्या आहेत. त्यामुळे येथे रोजच वाहतूक कोंडी असते. त्यामुुळे गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी चक्रकार वाहतूक सुरू केली आहे. येथील वाहतूक कोंडीसाठी या टपर्यांवर कारवाई होणे गरजेचे होते. हिंजवडी, शिवाजी चौकातील रस्त्यावरील टप-यांवर पीएमआरडीएने सकाळपासून कारवाईला जोरदार सुरुवात केली आहे. रस्त्यांवरील टपर्यांवर हातोडा चालविला जात आहे. जेसीबीच्या सहाय्याने कारवाई केली जात असून कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हिंजवडी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.