जळगाव । पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व अप्पर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस अधीक्षक सचिन सांगळे यांनी वाहनधारकाविरुध्द कारवाईची मोहिम राबविली. शहरभर एकाचवेळी झालेल्या या मोहिमेंतर्गत रामानंद पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे, जिल्हापेठ पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे, एम.आय.डी.सी.पोलीस ठाणे व शनीपेठ पोलीस ठाण्यात वाहतुक पोलीस शाखेतील 18 कर्मचार्यांची विभागणी करण्यात आली. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्यांनी त्यांच्या भागात फॅन्सी नंबर प्लेट, विना क्रमांकाची वाहने, वाहतुकिचे नियमभंग करणारे चालकांवर कारवाई करून दंड वसुल केला.
येथे केली कारवाई
स्वातंत्र्य चौक, नेरी नाका, टावर चौक, गणेश कॉलनी, 90 डिग्री, एम.जे.महाविद्यालय, बहिणाबाई उद्यान , काव्यरत्नावली चौक, गुजराल पेट्रोल पंप येथे कारवाई करण्यात आली. त्यात सायंकाळपर्यंत वाहतुक पोलीसांनी 90 वाहनधारकांवर कारवाई करून 20 हजार रुपयांपर्यंत दंड वसुल केला होता.