वाहतूक पोलिसांनी बुजविले महामार्गावरील रस्ते

0

हडपसर । पुणे सासवड महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. अपघाताचे प्रमाणही येथेर वाढले होते. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत होता. त्यामुळे चालकांची गैरसोय दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला. त्यांनी हे खड्डे बुजवून वाहनांची कोंडी फोडली. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

पुणे सासवड महामार्गावर फुरसुंगी पेट्रोल पंपाजवळ जवळ रस्त्यावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूककोंडी होत होती. या खड्डयांमुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याने हडपसरचे वाहतूक पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चौरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी खड्डे पडलेले मला माहित आहे, असे उडवाउडवीचे उत्तर देऊन फोन कट केला. त्यांच्या दुरुस्ती करण्यास त्यांनी टाळाटाळ केली. वाहतूककोंडी होत असल्याने वाहतूक पोलिसांवर प्रचंड ताण येत होता. म्हणून शिंदे यांनी पुढाकार घेऊन पोलीस सहकारी व जवळील दुकानदारांच्या मदतीने खड्डे बुजविले. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत झाली. यासाठी नानासाहेब सूर्यवंशी, तुकाराम वरखडे, भाऊसाहेब काटकर, उद्धव निरस, नितीन कलानी, भाऊसाहेब येवले, महादेव राऊत, राजू मोडक, सोमनाथ हरपळे, दीपक बारवकर, लहू पवार यांनी मदत केली.