वाहतूक शाखेची 50 रिक्षांवर दंडात्मक कारवाई

0

धुळे । शहर वाहतूक शाखेने गुरूवारी बेशिस्त रिक्षचालकांकडे आपला मोर्चा वळवित धडक कारवाईला सुरुवात केली आहे. तब्बल 50 हून अधिक रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली. शहरातील रस्त्यांवर बेशिस्तपणे उभे राहून वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या रिक्षाचालकांवर ही कारवाई करण्यात आली. यावेळी वाहनाची कागदपत्रे तसेच अन्य पूर्तता नसलेल्या रिक्षा ताब्यात घेवून त्या शहर वाहतुक शाखेच्या आवारात लावण्यात आल्या.

सर्व रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दंड भरणार्‍या रिक्षा चालकांची अवघ्या काही वेळात सुटका झाली तर दंड न भरणार्‍या रिक्षाचालकांचे प्रकरण न्यायालयात पाठविण्यात येणार असल्याचे वाहतुक शाखेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.