भुसावळ- वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त संस्कृती फाउंडेशन व भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, 6 हेल्मेट वापर जनजागृतीसाठी भव्य हेल्मेट वाहन रॅली सकाळी 10 वाजता नाहाटा महाविद्यालयापासून काढण्यात येईल. चौफुली महात्मा गांधी चौक पर्यत असेल रॅली सकाळी 10 वाजेला सुरवात होईल त्या मध्ये अष्टभुजा चौक व बाजारपेठ चौक ह्या दोन मुख्य चौकात वाहन सुरक्षितता संदर्भात संस्कृती फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून पथनाट्य सादर केले जाणार आहे. ह्या हेल्मेट महा दुचाकी रॅली मध्ये सहभागी होण्याचे आवाहन भुसावळ शहर वाहतूक शाखाप्रमुख दीपक गंधाले व संस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष रणजीसिंग राजपूत ह्यांच्या वतीने करण्यात आले आहे.