भुसावळात कारवाईचा वाहनधारकांनी घेतला धसका ; कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी
भुसावळ- शहर वाहतूक शाखेतर्फे वाहतूक सुरक्षा सप्ताहांतर्गत 4 ते 10 फेब्रुवारीदरम्यान 253 वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली तर शहरातील के.नारखेडे व द वर्ल्ड स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांनी मार्गदर्शनही केले.
253 वाहनधारकांवर कारवाई
गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेच्या 20 कर्मचार्यांनी शहरातील विविध ठिकाणी सुरक्षा सप्ताहात 253 वाहनधारकांवर केसेस केल्या. सीटबेल्ट न लावणे, लायसन्स नसणे, ट्रीपलसीट प्रवासी तसेच हेल्मेट नसणे आदी प्रकारच्या 253 केसेसच्या माध्यमातून 51 हजार 600 रुपये दंड वसुल करण्यात आला. दारू पिवून वाहन चालवणार्या दहा वाहनधारकांवर केसेस करण्यात आल्या तर अवैधरीत्या प्रवाशांची वाहतूक करणार्या चार वाहनधारकांविरुद्ध करण्यात आली तसेच रस्त्यात बेशिस्तपणे रीक्षा लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या आठ केसेस करण्यात आल्या.