चिखली : येथील वाहतूक सुरुळीत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस उपायुक्त वाहतूक विभागास निवेदन देण्यात आले आहे. चिखली भागात नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या भागातुन नोकरीच्या निमित्ताने ये-जा करणार्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तळवडे, आयटी पार्क, चाकण, निघोजे, मोई या ठिकाणी नोकरी निमित्ताने नागरिक चिखली, कुदळवाडी भागातून जात असतात. यामुळे रात्रीच्या, वेळी सकाळी वाहतूक कोंडी होत असते. तसेच चिखली चौक, कुदळवाडी चौक, मोईफाटा चौक याभागातील वाहतूक नियंत्रक दिवे चालू करण्यात यावे. वाहतूक कोडींवर उपाययोजना करण्यात यावी व वाहतूक सुरुळीत, करावी अशी मागणी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी वाहतूक विभागाला केली आहे.