पिंपरीः इमरान मिया बेग यांची शिवसेना प्रणित महाराष्ट्र शिव वाहतूक सेना पिंपरी-चिंचवड शहर उपविभाग संघटकपदी निवड करण्यात आली. शिवसेना उपनेते तथा महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी इमरान मिया बेग यांना निवडीचे पञ दिले. ही निवड महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे सागर लांगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र उपाध्यक्ष लक्ष्मण वाळके, कार्याध्यक्ष शरीफ देशमुख यांच्या उपस्थित करण्यात आली. यावेळी विनय मोरे, रिजवान बेग, चंद्रकांत तिवारी आदी उपस्थित होते. याबाबत इमरान बेग म्हणाले की, आज वाहतुकदारांना खंबीर नेतृत्वाची गरज असून त्यांची विश्वासहर्ता जपणे ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने सर्वसामान्य वाहतुकदार व जनतेला अभिप्रेत असणारी वाहतूक सेना उभारली पाहिजे. एक वर्षाच्या काळात सर्वांना बरोबर घेऊनच काम करणार आहोत.