नगरसेवक वाघेरे यांनी केली मागणी
हे देखील वाचा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढत्या वाहनांचा ताण देखील शहरावर पडू लागला आहे. त्यामुळे पिंपरी- चिंचवड शहराचे वाहतूक नियोजन फसल्याने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते आहे. पिंपरी प्रभाग क्र.21 मधील पिंपरी बाजारपेठ येथे इमारतीमध्ये वाहनतळाची व्यवस्था नसल्याने वाहने बाहेरील रस्त्यावरच उभी केली जातात, परिणामी अशा वाहनांमुळे पिंपरीतील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झालेली आहे. तरी आसवाणी ब्रिज व वाल्मिकि चौक येथे वाहनतळ उभारण्याची गरज आहे. जेणेकरुन नागरिकांची वाहने सुरक्षितपणे उभी राहतील आणि वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही. तरी वरील दोन्ही ठिकाणी महापालिकेमार्फत वाहनतळ त्वरीत उभारण्यात यावे, यासाठी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.