वाहनाचा कट लागल्याचे निमित्त : तरुणाला मारहाण करीत कारच्या काचा फोडल्या

जळगाव : गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून गेंदालाल मिल येथील तरुणाला बेदम मारहाण करून कारच्या काचा फोडण्यात आल्या. ही घटना गुजराल पेट्रोल पंपाजवळ घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दखल करण्यात आला.

वाहनाच्या काचा फोडत माहराण
शेख अक्रम शेख करीम (गेंदालाल मिल, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवार, 5 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास कार (क्रमांक एम.एच. 02 सी.डी.4976) ने शहरातील गुजराल पेट्रोल पंपांजवळ कारचा वाहन क्रमांक (एम.एच.19 बी.झेड.4747) ला कट लागला. या रागातून पवन राजेंद्र ठाकरे (निमखेडी, रा.जळगाव) याने शेख अक्रम यांना शिविगाळ केली तर कारच्या काचा फोडून नुकसान केले. या प्रकरणी सोमवार, 6 जून रोजी रात्री 9 वाजता पवन राजेंद्र ठाकरे याच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार संजय सपकाळे करीत आहे.