शहादा । कर्जोत पिंपर्डे येथे रस्ता ओलांडताना टोयाटो प्रवासी वाहतुक वाहनाने धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाले आहे. भारत मंगा पाडवी यांचा फिर्यादिवरुन पोलीसात वाहन चालक प्रशांत गिरधर पवार (रा.जाम जावदा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शहादा येथुन लोहारा गावाकडे जाणारी टोयाटो प्रवासी वहातूक क्र.(एमएच 31 जे 7465) भरधाव वेगाने वाहनचालक प्रशांत गिरधर पवार चालवत होते. कर्जोत पिंपर्डे गावाजवळ पुनम नामदेव महाले व मनिषा गिरधर महाले (दोन्ही राहणार कर्जोत) हे रस्ता ओलांडत असतांना भरधाव येणार्या प्रवासी वाहनाने धडक दिली. झालेल्या या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धुळे जिल्हा ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. या घटनेबाबत वाहन चालकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन चालक प्रशांत पवार हा फरार झाला आहे.