मुक्ताईनगर। मुक्ताईनगर भुसावळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील हरताळा फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच ते सहा वयोगटातील बिबट्याचे बछडे मंगळवार 2 रोजी रात्री 10:30 च्या सुमारास मृत्युमुखी पडले आहे. परिसरातील नागरिकांना हे बछडे मयत अवस्थेत दिसल्याने त्यांनी वनविभागास याची माहिती दिल्यावरुन वनविभागाचे कर्मचारी व पशुवद्यकिय अधिकारी गेलेले असल्याची माहीती वनपरिक्षेत्र अधिकारी पी. टी वराडे यांनी दिली.
भरधाव वाहनांमुळे वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात
दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मयत झालेले बिबट्याचे पिल्लु मादी जातिचे असुन भरधाव वेगाने आलेल्या वाहनाच्या धडकेमुळे या बछड्याच्या डोक्याला जबर मार लागल्याचे दिसुन आले. वनविभागाचे कर्मचारी बिबट्याचे पिल्लुला हरताळा वनहद्दीत घेवुन गेले. बुधवार 3 रोजी सकाळी त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आले असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा शिवारात यापूर्वीही दोन महीन्याआधी एक हरीण व तीन दिवसापूर्वी हरीणाचे पिल्लु अज्ञात वाहनाच्या धडकेतच ठार झाल्याच्या घटना ताज्या असताना पुन्हा बिबट्याचे पिल्लु अज्ञात वाहनाचे पिल्लु ठार झाल्याची घटना घडली. यावरुन मुक्ताईनगर वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. परिसरात वाघीण असल्याची दाट शक्यता आहे तसेच सदर वाघिणीने अजुन किती पिल्लांना याचा थांग पत्ता वनविभागास तरी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, व वनविभाग यापासून अनभिज्ञ आहे अशी ओरड वन्यप्रेमींकडून होत आहे.