ऐरोली : ऐरोली सेक्टर 3 अग्निशमन केंद्रानजिक पदपथावरून राजेंद्र बाळासाहेब थोरात (वय 45) हे पायी चालत असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. थोरात आपल्या मुलीला भेटण्यासाठी सांगलीवरून आले होते.
सोमवारी सकाळच्या वेळी रस्त्याने जात असताना भरधाव वेगाने पाठीमागून येणार्या वाहनाची जोरदार धडक त्यांना बसल्याने ते जमिनीवर पडले असावेत. तसेच यावेळी मेंदूतून रक्तस्राव जास्त झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तेथे त्यांचा झाला अशी माहिती रबाळे पोलिसांनी दिली. फरारी वाहन चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.