वाहनातील दारूसाठ्यासह पावणेतीन लाखाचा माल जप्त

0

साक्री । निजामपूर येथील नंदुरबार रोडवर एका ढाबा परिसरात संशयास्पद उभ्या असलेल्या वाहनाची तपासणी केली असता त्यात दारु साठा आढळून आल्याने पोलिसांनी वाहनासह दारु जप्त केली आहे. दरम्यान वाहनास 2 लाख 71 हजार 525 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री 8.30 च्या सुमारास पो.कॉ.सूर्यवंशी व अहिरे हे पेट्रोलिंग करीत असता नंदुरबार रोडवरील हॉटेल ढाबा कृष्णाच्या बाजूला एम.एच.41/ सी.5138 हे वाहन संशयास्पदरित्या उभे होते. पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी-विदेशी दारुचा साठा आढळून आला. याबाबत एपीआय पटले यांना खबर देण्यात आली. त्यांच्या उपस्थितीत वाहनासह दारु जप्त करुन सुनिल शांताराम जाधव रा.जैताणे याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला.