वाहनातून 50 हजारांचा मुद्देमाल लंपास

0

भुसावळ । येथील सुतार गल्लीतील रहिवाशाच्या कारमधून दांगिण्यांनी भरलेली पर्ससह 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना प्रांत कार्यालय परिसरात 28 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. सुतार गल्लीतील रहिवाशी राकेश पितांबर अहिरे यांनी आपले चारचाकी वाहन प्रांत कार्यालय परिसरातील मिलन चाट सेंटर जवळ लावले असता यातील पर्समधील 30 हजार रुपयांचे सोन्याचे पेंडल असलेली चैन, 5 हजाराचे 2 ग्रॅमचे सोन्याचे कानातले, रोख 13 हजार, 2 हजार किंमतीचा मोबाईल लंपास केला आहे. याबाबत शहर पोलीसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास इब्राहिम तडवी करीत आहे.