पिंपळगाव। येथील आरोपी युसुफ शेख नूर यास त्याने त्याच्या ताब्यातील मॅटेडोर वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चाचालवून वरखेडी ते पाचोरा रस्त्याने जाणार्या अॅक्टिव्हा वाहनास धडक दिली. त्यात अॅक्टिव्हा वाहनावरील स्वार समाधान बडगुजर आणि मिलिंद जोशी हे जखमी झाले होते.
तसेच आरोपी अपघाताची खबर न देता पळून गेला. म्हणून पिंपळगाव पोलिस स्थानकात भादवि कलम 279,337,338 आणि मो.वा.कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुह्यात आज 5 मे 17 रोजी आरोपीला कलम 279 मध्ये 1 महीना कैद व 500 रु दंड, कलम 337 मध्ये 1 महीना कैद व 500रु दंड , कलम 338 मध्ये 1 महिना कैद व 500 रू दंड आणि मो.वा.का. कलम 184 मध्ये 1 महिना कैद व 500 रू दंड पाचोरा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री मो.ताहेर बिलाल यांचे कोर्टाने ठोठावला. सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता मिलिंद येवले यांनी सदर केसचे कामकाज पाहिले तसेच पिंपळगावचे पोहेकॉ कुलकर्णी यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.