वाहने एकमेकांवर धडकल्याने झालेल्या अपघातात ६ जण ठार

0

लखनौ – उत्तर प्रदेशातील संभल येथे भीषण अपघातात 6 जण ठार झाल्याची घटना घडली आहे तर 13 जण जखमी झाले आहेत. एक प्रवासी बसची दुसऱ्या वाहनासोबत टक्कर झाल्याने ही भीषण दुर्घटना घडली आहे. संभल जिल्ह्यातील गुन्नौर पोलीस ठाणे क्षेत्रात हा अपघात झाला आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. धुक्यामुळे हा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस अधीक्षक यमुना प्रसाद यांनी वर्तवला आहे.