वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन

0

सुनीता तापकीर यांच्या पाठपुराव्याने

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत महिलांना चारचाकी वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन तापकीर चौक येथे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर व महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले. सुनीता तापकीर यांच्या पाठपुराव्याने व पुढाकाराने हे प्रशिक्षण सुरु करण्यात आले. यावेळी नगरसेविका सविता खुळे, निता पाडाळे, सामाजिक कार्यकर्त्या सारीका तापकीर, नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते, बाबासाहेब त्रिभुवन, भाजपा शहर उपाध्यक्ष हरेश तापकीर, चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, नरेश खुळे, सुभाष बनकर, छत्रभुज झाडे, संतोष ओझा, शशिकांत करुटे, अजय वाकोडे, अविनाश भंडारे आदी उपस्थित होते.

वाहन खरेदीसाठी पालिकेकडून सबसिडी
या प्रशिक्षणाबद्दल माहिती देताना सुनीता तापकीर म्हणाल्या की, पहिल्या टप्प्यात 1744 पात्र महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दुसर्‍या टप्प्यात 1600 पात्र महिलांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झालेल्या गरजू महिलांना व्यवसाय करण्यासाठी ओला व उबेरसारख्या वाहन खरेदीसाठी महापालिकेमार्फत सबसिडीची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वयाची 22 वर्षे पूर्ण केलेल्या महिला या योजनेत सहभागी होऊ शकतात. तसेच मोरवाडी आयटीआयमार्फत ऑनलाईन परीक्षेचा सराव करून घेण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपुर्ण भारतात अशी महानगरपालिका आहे जेथे महिलांसाठी मोफत चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे सर्व चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले आहे.