वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास मोबाईल होणार जप्त

0

महाराष्ट्रातही होणार कठोर निर्णयाची अंमलबजावणी
नवी दिल्ली । आता गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास मोबाईल जप्त होणार आहे. उत्तरखंडमध्ये तसे निर्देशच कोर्टाने दिले आहेत. उत्तराखंड पोलिसांनी दिलेल्या निर्देशानुसार जर कुणी गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना आढळला तर त्याचा मोबाईल किमान एक दिवस तरी जप्त करण्यात यावा, असे निर्देश कोर्टाने जारी केले आहेत. उत्तराखंडमध्ये सध्या मोबाईलवर बोलताना आढळल्यास 5 हजार रुपये दंड आकारला जातो. उत्तराखंडच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हा नियम कडक करण्याच्या हालचाली वाढण्याच्या दाट शक्यता नाकारता येत नाहीत.