वाहन चोरी थांबेना

0

कल्याण : कल्याण डोंबिवली परिसरात वाहन चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला आहे .काल डोंबिवली पूर्वेकडील शिवाजी पथ येथील भागीरथी सदन मध्ये राहणारे हेमंत सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या मालकीची इन्होवा गाडी बुधवारी रात्री च्या सुमारास इमारती शेजारी गाडी लावू गेले .अज्ञात चोरट्याने गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरून नेली.

या प्रकरणी सहस्त्रबुद्धे यांनी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे .तर दुसरी घटना कल्याण पश्चिमेकडील बाजारेपठ परिसरात घडली आहे .कल्याण पश्चिमेकडील जागर मजीद इमारती मध्ये राहणारे मुजम्मील मजीद यांच्या मालकीची रिक्षा त्यांनी काल घराशेजारी उभी करून ठेवली होती काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने हि रिक्षा चोरून नेली .सकाळी हि बाब निदर्शनास येताच त्यांनी याबाबत बाजारपेठ पोलीस स्थानाकात तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .तर वाढत्या वाहन चोर्यामुळे नागरिक मात्र धास्तावले आहेत.