गयाना : भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरुद्ध तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यातही विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. मालिका आधीच खिशात घातल्यामुळे भारतीय संघ आजच्या सामन्यात काही बदल करण्याची शक्यता आहे. दीपक चहर, लोकेश राहुल. श्रेयस अय्यर, राहुल चहर यांचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे.
संभाव्य संघ
भारत:रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, मनिष पांडे, कृणाल पांड्या, राहुल चहर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, नवदीप सैनी, खलील अहमद.
वेस्ट इंडिज: एव्हिन लुइस, सुनील नरीन, निकोलस पुरन, शिमरोन हेटमायर, किरॉन पोलार्ड, रोव्हमन पॉव्हेल, कार्लोस ब्रॅथवेट, किमो पॉल, खॅरी पिएरे, शेल्डन कोट्रेल, ओशाने थॉमस.