पुणे :एफटीआयआय रेडिओ वतीने च्या “दर्पण” या साहित्यिक कार्यक्रमाच्या मालिकेमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक व कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी सांगतेनिमित्त देणाऱ्याने देत जावे.” विंदा – एक दर्शन” या विंदांच्या लेखक म्हणून असणाऱ्या विविध पैलूंवर थोडक्यात पण नेटका प्रकाश टाकणारा एक नितांत सुंदर कार्यक्रम शुक्रवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी सादर करण्यात आला. यावेळी प्रिझम फाऊंडेशन संचालित फिनिक्स शाळेच्या “विशेष” मुलांनी सादर केलेल्या व म्हणून दाखविलेल्या कवितांनी त्यातही विशेषतः “देणाऱ्याने देत जावे…” या मुलांनी कविता सादर केल्या.”चांदण्यातील गप्पा” या किशोरवयीन मुलांच्या गटाच्या सामूहिक काव्यवाचनाला विशेष दाद मिळाली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असलेल्या मराठी साहित्याची गोडी लागलेल्या ” मुलांच्या वाचक गटानं बागुलबोवा, परी आणि दगड, पाऊस, लपंडाव इ. बालकविता व सबघोडे बारा टक्के,स्वेदगंगा कसा मी या कविता सादर केल्या.
या कार्यक्रम मध्ये डॉ. वंदना बोकील यांनी विंदांच्या अनुवाद कौशल्याविषयी विवेचन करून ‘राजा लिअर’ या विंदांनी केलेल्या अनुवादातील काही भागाचे अभिवाचन केले. प्रा. मिलिंद दामले यांनी स्पर्शाची पालवी या लघुनिबंधाचे वाचन केले. गायिका अपर्णा केळकर यांनी ‘सर्वस्व तुजला वाहुनि’ व ‘ओंजळीत स्वर तुझेच’ या कवितांचे गायन केले. कार्यक्रमावरत रंगत आली विंदांच्या कन्या जयश्री काळे यांच्यामुळे “विंदादर्शन” या कार्यक्रमातून विंदांचा जीवनपट उलगडताना त्यांच्या झपताल, ती जनता अमर आहे इ. कविता विंदाशैलीत सादर केल्या. नगरसेविका सौ. माधुरी सहस्रबुद्धे तसेच प्रा.आश्विन सोनोने यांचे हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय चांदेकर यांनी केले.