निंभोरा। येथील ग्रामपंचायतर्फे ग्रामसभेचे आयोजन केले गेले सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच डिगंबर चौधरी होते. ग्रामसेवक महेंद्र दुट्टे, तलाठी अनुपस्थित होते. सभेचे प्रोसिडींग वाचन मुख्य लिपीक भरत महाले यांनी केले. सुधाकर पुना, कडू चौधरी, चत्रभुज खाचणे, सरफराज खान, शुभम वाघ, दिलीप खैरे, आमीन खान, कमलाकर नेमाडे, संदिप खाचणे, सागर चौधरी, एमएसीबी उपअभियंता ठाकुर यांनी चर्चेत भाग घेतला
विविध समस्यांवर झाली चर्चा
निंभोरा येथील अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाणीपुरवठा संदर्भात ग्रामपंचायत उदासिन असलेने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. 14 व्या आयोगात जाब विचारतांना गावातील सुज्ञ नागरीक सुनिल कोडे, दुर्गादास पाटील यांनी गावातील समस्याबाबतीत ग्रामसभेत जाब विचारला मात्र 14 व्या आयोगाचा कोणताच निधी खर्च न झाल्याचे समोर आले. कृती आराखड्याचा विषय चालू असतांना त्याच्या अंतीम विषयाचे वाचन करण्यात आले. त्यातील जिल्हा परिषद शाळा कम्पाऊंड, गावात मुतारी हे विषय नामंजूर करण्यात आले. तसेच पाणी सुधीकरणासाठी 4 लाख, अपंगांसाठी 3 टक्के राखीव निधी, पुरुष व महिला शौचालय, गटारी उपसा यावर खर्चासाठी मजुरी देण्यात आली. नवीन पाप्ली ऐन परवानगी साठी गटारी, रस्ते, पथदिवे, सार्वजनिक शौचालय या सुविधा पूर्ण झाल्याशिवाय परवानगी देवू नये, अशी मागणी सभेत करण्यात आली. तसेच ग्रामसभेत महिला सदस्याची अनुपस्थिती होती. तलाठी गैरहजर असल्याने प्रल्हाद बोंडे यांनी पुढील तारखेस चावडीवाचनाबाबत सांगितले.