TushaR$0880
नामदार हरीभाऊ जावळे यांचे आवाहन : रमजीपूरला पाल-केर्हाळा गटाचा मेळावा
रावेर- पाच वर्षात जनतेला दिलेला शब्द मी पाळला आहे, प्रत्येक गावात काँक्रिटीकरण लहान-मोठे रस्ते झाले आहेत तर कुठे उद्घाटन होवून कामांना सुरुवात होणार आहे. परीसरातील शेतकर्यांची अनेक वर्षांपासून सबस्टेशनची असलेली मागणी भाजपा सरकारने पूर्ण केली आहे त्यामुळे भाजपा सरकारमार्फत मी केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा जनतेची सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन कृषी संशोधन परीषेचे उपाध्यक्षनामदार हरीभाऊ जावळे यांनी येथे केले. रमजीपूर येथे पाल-केर्हाळा गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते.
उर्वरीत विकासकामांसाठी द्यावी संधी
जावळे म्हणाले की, शेतकर्यांची अनेक वर्षापासून सबस्टेशनची मागणी होती तीदेखील भाजपा सरकारने पूर्ण केली आहे. पाल आश्रमशाळेत अनेक वर्षांपासून पुलाची मागणी होती तीदेखील पूर्ण झाली. देश्यात व राज्यात स्थिर सरकार देण्याचे काम जनतेने केले आहे. अद्याप काही विकासाची कामे अपूर्ण असून ही कामे पूर्ण करण्यासाठी येणार्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यांची मेळाव्याला उपस्थिती
मेळाव्याला माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, भाजपा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, जिल्हा परीषद सदस्या रंजना पाटील, नंदा पाटील, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमोल पाटील, पंचायत समिती सदस्य योगीता वानखेडे, जितेंद्र पाटील, धनश्री सावळे, जुम्मा तडवी, पी.के.महाजन, भाजपा सरचिटणीस वासु नरवाडे, दिलीप पाटील, सुकलाल महाजन आदी बुथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इच्छूक अनेक ः निष्ठावंतांना मिळणार तिकीट
रावेर-यावल मतदारसंघात काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून काही कामे दाखवून जनतेची दिशाभूल करीत आहे, यास कुणीही बळी पडे नये, असे आवाहन आमदार जावळे यांनी करीत इच्छुक उमेदवार भाजपाकडे खूप आहेत मात्र पक्षासाठी वर्षानुवर्ष काम करणार्या ज्येष्ठ कार्यकर्त्याचा पक्ष संघटन आधी विचार करते त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांचा भाजपात उमेदवारीसाठी विचार होता, असे सांगून भाजपाकडून इच्छुक असलेल्या अनेकांना नाव न घेतला त्यांनी चिमटाही काढला.