विकासकामांसाठी तरुणांनी एकत्र यावे – सुनील शेळके

0

तळेगाव : गावाच्या विकासासाठी तरुणांनी एकत्र यावे. त्यामध्ये कोणतेही राजकारण करून नये. असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी केले.
नवलाख उंबरे गावाच्या स्वागत कमानीचे भूमिपूजन सुनील शेळके यांच्या हस्ते आज (गुरुवार) करण्यात आले. यावेळी शेळके बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, माजी आर. टी. ओ. अधिकारी हरिचंद्र गडसिंग, ह.भ.प. विष्णू महाराज खांडेभराड, ह. भ. प. दिनकर शेटे, नितिन मोरे, तानाजी पडवळ, आबाजी बधाले, संदिप शेटे, विठ्ठल बधाले, सुभाष पापळ, बासरकर गुरुजी, बाळासाहेब लोणकर, प्रभाकर बधाले, माऊली कोयते, नवनाथ पडवळ, निवृत्ती शेटे, मनोहर गायकवाड, विजय शेटे, दिलीप बधाले, विश्वास शेटे, चंद्रकांत शेटे, दामोदर मराठे, पांडुरंग कोयते, गावातील तरुण व ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावाला वेस असणे गरजेच आहे. आता उभारण्यात येणारी कमान देखील वेशीचे प्रतीक असून लोकवर्गणीतून होणारे कमानीचे काम आदर्श काम आहे. गावाच्या वैभवात वाढ करण्यासाठी गावक-यांनी देणगीच्या स्वरूपात मदत करावी आणि तरुणांनी संघटित होऊन हे काम पूर्ण करावे. इतर सहकार्य आम्ही करू असेही शेळके म्हणाले.

हरिचंद्र गडसिंग म्हणाले की, पूर्वीचे नवलाख उंब्रे आणि आताचे नवलाख उंब्रे यामध्ये मोठा बदल झाला आहे. गावाच्या विकासात दिवसेंदिवस भर पडत आहे. ग्रामपंचायतीने लोकसहभाग वाढवून लोकहिताची कामे हाती घेतल्याने हा बदल शक्य झाला आहे.’

सरपंच दत्तात्रय पडवळ म्हणाले की, लोकवर्गणी आणि लोकसहभागातून उभारण्यात येत असलेल्या भव्य कमानीसाठी सुमारे 30 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. लोकवर्गणीला स्थानिक कंपन्यांच्या सीएसआर निधीचे देखील सहकार्य घेण्यात येणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र कडलक यांनी केले. प्रास्तविक सरपंच दत्तात्रय पडवळ यांनी केले आणि आभार उपसरपंच महेश शिर्के यांनी मानले.