विकासकामांसाठी सईदा अंसारींचे उपोषण

0

शहादा । येथील नगरपालिकेचे सत्ताधारी भाजपा गटाचे भा. ज. पा च्या नगरसेविका सइदाबी साजीद अंसारी यांचे पती सामाजिक कार्यकर्ते साजीद अंसारी हे 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपासुन तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत नगरपालिका प्रशासनाचा विरोधात नगरपालिकेचा मुख्य प्रवेश द्वाराजवळ उपोषणास बसले सोबत त्यांच्या पत्नी व नगरसेविका साईदाबी अंसारीसह कार्यकर्ते उपोषणास त्यांच्यासोबत होते. त्यानंतर 24 जुलै रोजी रात्री 7 वाजता जनता चौकात साजीद अंसारी हे जाहीर सभा घेणार आहेत.

प्रभागाकडे सातत्राने दुर्लक्ष…
साजीद अंसारी यांच्या म्हणण्यानुसार शहरात पाहिजे त्याप्रमाणात विकास कामे होत नाहीत. शहरात स्वच्छतेबाबत आवश्यक ती पाऊले उचलली जात नाही बोटावर मोजता येतील अश्या कार्यकर्त्यांची कामे केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे . पत्नी सइदाबी अंसारी यांच्या प्रभागाकडे दुर्लक्ष केले जात आहे असाही आरोप त्यांनी केला आहे. उपोषणानंतर साजीद अंसारी 24 एप्रिल रोजी जाहीर सभा घेणार आहेत . त्यामुळे सत्ताधारी भाजपाचा गटाला त्यांच्या गटाचा कार्यकर्त्यांचे आव्हान असल्याचे बोलले जात आहे