ग्रेडसेपरेटर, मैलाशुद्धीकरण, नाट्यगृहे, विद्युत प्रकाश व्यवस्थेसाठी निधी
मनपाचे इमारती कार्यालये, शाळा, नाट्यगृहांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणेची तरतुद
पिंपरी: शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी सुमारे 49 कोटी 99 लाख 56 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात गुुरुवारी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. यामध्ये, प्रभाग क्र. 26 मधील छत्रपती चौक उत्कर्ष चौकापर्यंत सिमेंट कॉक्रीटचा रस्ता करण्यासाठी सुमारे 15 कोटी 94 लाख 72 हजार 633 रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली. रावेत येथील रेल्वे उड्डाणपुलालगत असलेला सेवा रस्ता विकसीत करणे व आनुषंगिक कामे करणेकामी 4 कोटी 80 लाख 38 हजार 929 रुपयांच्या खर्च गृहित धरण्यात आला असून त्यासही मान्यता देण्यात आली.
संगणक खरेदीसाठी 1 कोटी 15 लाख…
मनपाच्या जलनिःसारण विभागाकडील कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्र. 9 खराळवाडी मधील कामगार नगर, अक्षय विहार सोसायटी, सोनकर सोसायटी, भक्ती सोसायटी परिसर व उर्वरित भागात मलनिःसारण व्यवस्था सुधारण्यासाठी 21 लाख 99 हजार 673 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. वैद्यकीय मुख्य कार्यालय व अंतर्गत दवाखाना/रुग्णालय विभागांकरिता आवश्यक 238 नग संगणक संच खरेदीकामी 1 कोटी 15 लाख 398 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. ई क्षेत्रीय विद्युत कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील मनपाचे इमारती कार्यालये, शाळा, नाट्यगृहे इ. मध्ये सी.सी.टी.व्ही. यंत्रणा बसविणेकामी सुमारे 30 लाख 96 हजार 598 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
चौकांमधील विद्युत विकासासाठी निधी…
प्रभाग क्र. 26 वाकड-पिंपळे निलख मधील विविध आरक्षणे विकासासाठी 1 कोटी 32 लाख 17 हजार 266 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. साई चौक येथील चौकात समतल वितलग बांधणे, विद्युत विषयक कामे, प्रकाश व्यवस्थेसाठी 42 लाख 27 हजार 780 रुपयांचा खर्च गृहित धरण्यात आला आहे. ई गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या सात संगणक प्रणालींची देखभाल व दुरुस्तीकामी 1 वर्ष मनुष्यबळ उपलब्ध करून देणेकामी सुमारे 11 लाख 21 हजार 112 रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली. प्रभाग क्र. 2 मधील देहू-आळंदी रस्त्यालगतचे परिसरातील ताब्यात आलेले रस्ते विकासासाठी 1 कोटी 55 लाख 02 हजार 729 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
शाळांमधील खेळणी खरेदी…
प्रभाग 2 मधील बोर्हाडेवाडी बनकरवस्ती मधील ताब्यात आलेले रस्ते विकसित करणेकामी येणार्या सुमारे 1 कोटी 52 लाख 39 हजार 497 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाच्या उद्यानांमधील/शाळांमधील खेळणीचे स्पेअर पार्ट पुरविणे व बसविणेकामी 2 कोटी 94 लाख रुपयांच्या खर्चास मंजूरी दिली. मिलीटरी हद्दीतील बी.ई.जी. दिघी हद्दीमध्ये 35 हजार वृक्षारोपण करून 3 वर्षे देखभाल व संरक्षणकामी येणार्या 3 कोटी 25 लाख 50 हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
मनपा शाळांना इंटरनेट सुविधा…
प्रभाग क्र. 27 रहाटणी मधील श्रीनगर, गजानन नगर, रायगड कॉलनी येथील काँक्रीट रस्त्यावर विद्युत पॉल उभारणेकामी येणा-या सुमारे 89 लाख 15 हजार 120 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपा प्राथमिक शाळांकरिता इंटरनेट बंडविडथ सेवा एम.पी.एल.एस./ व्ही.पी.एन. द्वारे पुरविणे व देखभाल
करणेकामी येणार्या 65 लाख 23 हजार 201 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. बलदेवनगर झोपडपट्टी, पिंपरी येथे अस्तित्वातील जूने सार्वजनिक शौचालय पाडून तेथे नविन 16 सीट्सचे सुलभ शौचालय बांधणेकामी येणार्या सुमारे 36 लाख 28 हजार 911 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
जुने पाडून नवीन शौचालये बांधणी…
सुभाषनगर, पिंपरी येथे अस्तित्वातील जूने सार्वजनिक शौचालय पाडून तेथे नविन 16 सीट्सचे सुलभ शौचालय बांधणेकामी – 38 लाख 89 हजार 818 रुपये, प्रभाग क्र. 17 बिर्ला हॉस्पिटल ते वाल्हेकरवाडी रोड येथे पैसे द्या व वापर तत्वावर स्त्री व पुरुषांसाठी सुलभ स्वच्छतागृहासाठी – 40 लाख 34 हजार 468 रुपये. बलदेवनगर झोपडपट्टी, पिंपरी येथे अस्तित्वातील जूने सार्वजनिक शौचालय पाडून नविन 16 सीट्सचे सुलभ शौचालय – 36 लाख 28 हजार 911 रुपये.
डी.पी.रस्त्यासाठी 3 कोटी 33 लाख…
प्रभाग क्र. 2 मोशी जाधववाडी शिवेवरील विकास आराखड्यातील 24 मी.डी.पी. रस्ता विकासासाठी 3 कोटी 33 लाख 71 हजार 307 रुपये, काळेवाडी फाटा येथे व वाकड कस्पटेवस्ती ते पिंपरी काळेवाडी ग्रेड सेपरेटर बांधणे या कामांतर्गत विद्युत विषयक कामे – 1 कोटी 86 हजार 430 रुपये. इठढड कॉरीडोर क्र. 3 वर सुदर्शन नगर चौक येथे ग्रेडसेपरेटर कामांतर्गत विद्युत विषयक कामे करण्याकामी 1 कोटी 27 लाख 64 हजार 062 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
चाफेकर चौकात भुयारी मार्ग…
प्रभाग क्र. 15 मध्ये चाफेकर चौकात पादचार्यांसाठी भुयारी मार्ग विकसित करणे कामांतर्गत येणार्या सुमारे 1 कोटी 40 लाख 26 हजार 2015 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. विषय क्र. 50 प्रभाग क्र. 3 मधील आदर्शनगर डी.पी. रस्ता विकसित करणे, रस्त्यावर विद्युत कामे – 67 लाख 61 हजार 158 रुपये खर्च करण्यात येणार असून या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपातील अ,ब,ई व फ मैलाशिद्धीकरण केंद्रामध्ये स्थापत्य विषयक कामांसाठी 75 लाख 83 हजार 312 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
जलशुद्धीकरण केंद्रासाठी निधी…
बोपखेल येथील मनपाच्या आरक्षित जागेत उद्यान विकास – 31 लाख 72 हजार 731 रुपये, अ क्षेत्रीय कार्यालय इमारतीच्या आवारात उद्वाहक बसविणे, अनुषंगिक कामांसाठी 28 लाख 57 हजार 584 खर्च, थेरगाव एम.एस. गुरुत्ववाहिनीची देखभाल दुरुस्ती – 34 लाख 19 हजार 578 रुपये, जलशुद्धीकरण केंद्र से.23 करिता 1199 मे.टन लिक्विड वायू खरेदीकामी सुमारे 1 कोटी 52 लाख 87 हजार 250 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.