सावदा । शहरात सध्या सुरु असलेली विकास कामे हि आमच्या कार्यकाळात मंजूर झालेली आहेत. त्यांचा निधी सुद्धा आमच्या कार्यकाळात आलेला असून फक्त निवडणूक काळात आचारसंहिता लागल्याने सदर कामांची निवीदा तेव्हा होऊ शकली नाही, ती आता होत आहे. त्यामुळे हि सर्व कामे चांगल्या दर्जाची व गुवात्तापूर्ण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच पालिकेत बाह्य सत्ताकेंद्रे हस्तक्षेप करून कामांचे टेंडर ती कोणास मिळावी त्यात आपली टक्केवारी किती याचा विचार करून ती कामे दिली जात असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी केला आहे. पालिकेत सुरु असलेल्या कामकाजावर भाष्य करण्यासाठी नगरसेवक वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधार्याच्या कार्यपध्दतीवर टिका केली. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी होणार्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध होता मात्र त्यावेळी निवडणूकाच्या आचारसंहीतामुळे टेंन्डरींचे कामे रद्द झाले होते. मात्र अजूनही टेंडर काढणेस विलंब झाला आहे.
कामे करा पण राजकारण करू नका
पुढे बोलताना वानखेडे म्हणाले की, कामे करा शहर विकासात आम्ही साथ देऊ पण राजकारण करू नका तसेच कामे चांगली करा असे बजावले. आम्ही सावदा शहरात एलईडी पथदिवे बसविण्याबाबत 23 जून 2015 रोजीच्या सभेत ठराव क्रमांक 13 दलितवस्ती सुधारणा योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक 2 मध्ये एलईडी पथदिवे बसविणे या विषयावर चर्चा होऊन तो मंजूर झाला. तसेच 19 सप्टेंबर 2015 चे सभेत ठराव क्रमांक 32 विशिष्ट पूर्ण योजना किंवा कोणत्याही निधीतून नगरपालिका हद्दीतील पारंपारिक पद्धतीच्या स्ट्रीट लाईटच्या जागी नवीन एलईडी पथदिवे बसविणे या विषयावर चर्चा होऊन तो मंजूर झाला त्यावर निधी देखील मिळविला पण सदर कामे त्यावेळी आचारसंहिता लागल्याने त्याचे टेंडर होऊ शकले नाही आता या कामांचे टेंडर काढणसे देखील विलंब झाला.
टेंडरमध्ये इतरांचा हस्तक्षेप
टेंडर काढताना देखील बाहेरील लोक यात हस्तक्षेप करीत असून टक्केवारी कशी मिळेल, याकडे लक्ष पुरवत असल्याने सदर काम गुणवत्तापूर्ण होईल कि नाही? याची शाश्वती नाही तरी हि सर्व आमचे कार्यकाळात मंजूर झालेली कामे चांगली उत्कृष्ट व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली याबबत त्यांनी एक निवेदन देखील प्रसिद्ध केले आहे, यावेळी वानखेडे यांचे सोबत राष्ट्रवादी काँग्रसचे गटनेते फिरोजखान हबीबुल्ला खान, तसेच नगरसेवक सिद्धार्थ बडगे आदी उपस्थित होते.