खासदार रक्षा खडसे ; काहुरखेडा येथे विविध विकासकांमाचे उदघाटन
वरणगाव:- गावा-गावात विकासकामे करण्याकरीता नागरीकांनी एकत्र येण्याची गरज असून गावाची लोकसंख्या वाढत असल्यामुळे विकासही वाढतो आहे. गावात कोणतीही विकासकामे होत असल्यास हे काम प्रत्येकाने माझे आहे, असे समजून लक्ष दिल्यास होणारे काम निश्चितच चांगल्या दर्जाचे होईल, असा विश्वास खासदार रक्षा खडसे यांनी येथे व्यक्त केला. भुसावळ तालुकयातील काहुरखेडा येथे विविध विकासकामांचे उद्घाटन खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
भांडण नसलेल्या गावांचा होतो विकास -आमदार सावकारे
गावांमध्ये समन्वयाच्या अभावामुळे कामे थांबत असून ज्या गावांमध्ये भांडण तंटे नाहीत त्या गावात विकासकामे मोठ्या प्रमाणात होतो. लोकप्रतिनिधी हे कामे मंजूर करण्यासाठीच असतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावा-गावात पाणटंचाई सुरू आहे. नागरीकांनी पाणी जपून वापरावे तसेच गावा-गावात शोषखड्डे करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी आमदार संजय सावकारे, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हा परीषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे, मनिषा पाटील, वंदना उन्हाळे, भुसावळ सार्वजनिक विभागाचे यु.के.कुरेशी, पाणीपुरवठा अभियंता एस.पी.लोखंडे, सुधाकर जावळे, सरपंच जया वराडे, उपसरपंच अरुण वराडे, ग्रामसेवक संतोष मोरे आदी मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज तसेच तथागत भगवान बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य समाधान पाटील, संतोष तायडे, सदस्या सविता वराडे, लक्ष्मी इंगळे, सीमा पाटील, आशा भील, भरत पाटील, कडू तायडे तसेच पदाधिकारी व ग्रामस्थांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार पुरुषोतम पाटील यांनी मानले