विकासदराची घसरगुंडी!

0

नवी दिल्ली । देशाचा विकास दर 2.2 टक्क्यांनी घसरल्याची माहिती मिळाली आहे. एप्रिल – जून 2017 या काळात देशाच्या विकासदरात 5.7 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. गेल्यावर्षी याच काळात देशाचा विकासदर 7.9 टक्के एवढा होता. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत विकासदर 2.2 टक्क्यांनी घसरला आहे. उत्पादनक्षेत्रात घट झाल्यामुळे विकासदरात मोठी घसरण झाली. तर एप्रिल- जून या काळात सेवाक्षेत्रातील विकासदराचे आकडे समाधानकारक आहेत. देशातील महत्त्वाच्या 8 क्षेत्रांचा विकासदर जुलैमध्ये 2.4 टक्क्यांवर घसरला आहे. एका वर्षापूर्वी याच 8 क्षेत्रांचा विकासदर 3.1 टक्के एवढा होता. अर्थव्यवस्थेच्या या 9 महत्वाच्या क्षेत्रांचा विकासदर कमी झाल्याने त्याचा परिणाम देशाच्या विकासदरावर पडला.