मुंबई – राज्याचा विकास दर शहरांच्या विकासावर अवलंबून असल्याने स्वच्छ शहरांची निर्मिती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी केले.
अमृत व नगरोत्थान अभियानातंर्गत राज्यातील २८ शहरांमध्ये एक हजार ६२२ कोटी रूपयांच्या विविध प्रकल्पांचे ई-भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज त्यांच्या वर्षा, या शासकीय निवासस्थानी झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सुनील तटकरे, विनायक जाधव पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, नगरपरिषद संचालनालयाचे आयुक्त विरेंद्र सिंह आदी यावेळी उपस्थित होते.
उंच इमारती, सुंदर रस्ते व बगीचे तयार केले म्हणजे शहरांचा विकास झाला असे मानणे पूर्णत: योग्य ठरत नाही तर शहरांमधील नागरिकांना शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, मलनि:स्सारणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करणे, सांडपाण्याचा पुनर्वापर करून शहरांमध्ये हरितपट्टे तयार केल्यास शहरांचा विकास होईल, असे ते म्हणाले.
स्वच्छ, सुंदर व स्मार्ट शहरांच्या निर्मितीसाठी शहरांचा विकास आराखडा महत्त्वाचा असतो. शहरांचा नियोजनबध्द विकास होण्यासाठी यापुढे शहरांतील बांधकामांचे नकाशे डिजिटल पध्दतीने मंजूर करण्यात येणार आहेत. शहरांमधील कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण होण्यासाठी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. कामांची गुणवत्ता न राखल्यास संबंधितांवर कारवाई करण्यास शासन मागेपुढे पाहणार नाही. त्याचबरोबर उत्तम शहरे निर्माण व्हावीत यासाठी निवड स्पर्धा सुरु करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शहरांच्या विकासाला चालना देण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण कामे होण्यास मदत होणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.
नागरिकांना त्यांच्या कामासाठी कार्यालयात जाण्याची गरज भासू नये यासाठी नागरी भागातील सर्व सेवा ऑनलाईन देण्यासाठी ई- पोर्टल तयार करण्यात येत आहे. राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून राज्यातील 100 शहरे संपूर्ण हागणदारीमुक्त झाली आहेत. येत्या ऑक्टोबर 2017 पर्यंत राज्यातील संपूर्ण शहरे हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
नगरविकास विभागाचा अभिनव उपक्रम – रामराजे नाईक निंबाळकर
एकाचवेळी राज्यातील २८ शहरांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून एक हजार २६६ कोटी रूपयांच्या विविध प्रकल्पांचे ई-भूमिपूजनाचा उपक्रम राज्यात प्रथमच होत आहे. नगरविकास विभागाचा हा अतिशय अभिनव उपक्रम असल्याचे उद्गार विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांशी ‘फेसटाईम’च्या माध्यमातून संवाद साधताना काढले.
गुणवत्तापूर्ण कामास प्राधान्य – बबनराव लोणीकर
अमृत)पुरवठा (8.62 कोटी), सेनगाव पाणीपुरवठा (12.87 कोटी), देवळाली प्रवरा पाणीपुरवठा (15.25 कोटी), दोंडाईचा वरवाडे पाणीपुरवठा (20.91 कोटी), सिंदखेडा पाणीपुरवठा (21 कोटी), मालेगाव उड्डाणपूल (21.72 कोटी), राहता भुयारी गटार योजना (24.81 कोटी), रोहा भुयारी गटार योजना (28.81 कोटी), लोणावळा पाणीपुरवठा (33.49 कोटी), अहमदपूर पाणीपुरवठा (44.52 कोटी), पाचोरा भुयारी गटार योजना (56.96 कोटी), जयसिंगपूर भुयारी गटार योजना (58.96 कोटी), चांदवड पाणीपुरवठा (64.05 कोटी), जामनेर भुयारी गटार योजना (66.54 कोटी), इस्लामपूर भुयारी गटार योजना (69.42 कोटी), हिंगोली भुयारी गटार योजना (69.43 कोटी), फलटण भुयारी गटार योजना (72.70 कोटी), गडचिरोली भुयारी गटार योजना (94.37 कोटी).