विकासनगरातून माय-लेक बेपत्ता

0

देहूरोड : विकासनगर येथील टीसी कॉलनी परिसरातून आठ महिन्याच्या बालिकेसह एक महिला बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी महिला व बालिका बेपत्ता झाल्याची नोंद घेतली आहे. प्रमिला नीलेश जाधव (वय 25) व प्रार्थना नीलेश जाधव (वय आठ महिने, दोघी रा. टीसी कॉलनी, विकासनगर) अशी बेपत्ता झालेल्या माय-लेकीची नावे आहेत.

शोधाशोध करुनही थांगपत्ता नाही
रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रमिला आपली मुलगी प्रार्थना हिला घेऊन घरातून बाहेर गेली. मात्र, सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे घरच्यांनी तिचा परिसरात शोध सुरू केला. मात्र, ती कुठेही सापडली नाही. ती बेपत्ता झाल्याची खात्री पटल्यानंतर पती नीलेश विश्‍वास जाधव यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात त्यांची बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. देहूरोड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.