विकासासाठी जलसंपदा मंत्र्यांनी वरणगाव घेतले दत्तक

0

भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ ; वरणगावात प्रधानमंत्री आवास योजनेचा शुभारंभ

वरणगाव- नाथाभाऊंच्या आशीर्वादाने आम्ही दोन्ही मोठे झालो असून एकाच गुरूचे आम्ही चेले आहोत, सर्व समाजाला सोबत घेवून जाती-पातीचे राजकारण न करता वरणगावच्या विकासासाठी हे शहर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दत्तक घेतल्याची ग्वाही भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी येथे दिली. गुरुवारी मंत्री महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रधानमंत्री आवास योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उदय वाघ बोलत होते. नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांनी शहर स्मार्ट बनवण्याचा संकल्प केला असून त्यांची कामाची तळमळ पाहता आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचेही वाघ म्हणाले.

इतरांनी विकासाचे घ्यावे शिक्षण
छत्रपती शिवाजी मंगल कार्यालयात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात उदय वाघ म्हणाले की, सुनील काळे यांचे वडील मास्तर होते तर तेदेखील स्वतः शिक्षक आहेत त्यामुळे इतरांनीदेखील त्यांचे अनुकरण करून विकासाचे शिक्षण घेतले पाहिजे. काळे यांनी पदभार स्वीकारताच मंत्री महाजन यांच्या माध्यमातून वरणगाव पालिकेला 15 कोटींचा भरीव निधी मिळाला, असे सांगून वरणगाव शहर लवकरच स्मार्ट सिटी बनणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती
नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगरध्यक्ष शेख अखलाक, ज्येष्ठ कार्यकर्ते शेख अल्लाउद्दीन शेठ, बापू जंगले, माजी सभापती राजेंद्र गुरचळ, राजेंद्र चौधरी, गणेश धनगर, सुकलाल धनगर, माला मेढे, महेनाजबी पिंजारी, नसरीन बी.कुरेशी, प्रतिभा चौधरी, वैशाली देशमुख, मिलिंद मेढे, शामराव धनगर, नामदेव मोरे, साजीद कुरेशी, इरफान पिंजारी आदींनी दीपप्रज्वालन केले. यावेळी सर्वांसाठी घरे (नागरी अंतर्गत) प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्प सल्लागार चिंतन शिंदे यांनी योजनेबाबत नागरीकांना सविस्तर मार्गदर्शन करुन त्यासाठी लागणारे कागदपत्रांची माहिती यावेळी दिली. यशस्वीतेसाठी वरणगाव पालिका कर्मचारी रवी नारखेडे, कृष्णा माळी, संतोष वानखेडे, राजेंद्र गायकवाड, रामदास भोई, प्रशांत माळी, रवींद्र धनगर आदींनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय माळी यांनी केले.