भैरवनाथ महाराजांचा उत्सवामध्ये व्यक्त केले मत
चिंबळी : केंद्रात सत्ता असतानाही खासदार व आमदार यांनी खेड तालुक्यात काय, काय विकास केले व किती तरूणांना नोकरीला लावले, हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. गावचा विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठीमागे उभे राहून खासदार व आमदारांना येत्या निवडणुकीत जनतेने धडा शिकवला पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार दिलीप मोहिते यांनी माजगांव येथे केले. माजगाव (ता. खेड) येथे भैरवनाथ महाराजांचा उत्सव नुकताच पार पडला. या उत्सवाचे औचित्य साधुन शाळा बांधकाम, सभामडंप, समामंदिर व सिमेंट काँक्रेट रस्त्याचे भुमिपुजन माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेंसचे अध्यक्ष कैलाश सांडभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चद्रंकात इगंवले, माजी सभापती विलास कातोरे आदी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते बोलत होते.
सदस्यांची होती उपस्थिती
याप्रसंगी सरपंच रेश्मा सोनवणे, ग्राम पंचायत सदस्या भारती कातोरे, उप संचालक बेबी अवघडे, कैलाश लिंभोरे, अरूण चौधरी, ग्राम पंचायत सदस्य आप्पासाहेब बटवाल, पवन पाठारे, माजी सरपंच अर्जुन अवघडे, माजी संचालक खंडू पाठारे, माजी उपसंरपच हेमंत जैद, संचालक बाळासाहेब बर्गे, माजी उप संचालक दादासाहेब जैद, माजी उपसरपंच अजंना पाठारे, नुतन पाठारे, पांडूरंग पाठारे, गुरूदास उबंरकर, शांताराम घरदाळे, लक्ष्मण कातोरे, अर्जुन कातोरे, अरूण जैद, हिरामण जैद, साखरचंद लोखंडे, सत्यवान जैद, नारायण पवार, योगेश मेमाणे, आप्पा लोखंडे, गणेश जाधव, राजेंद्र जैद, तुकाराम पाठारे, पंडित कड, तुकाराम कातोरे, सर्व ग्रामस्थ व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळासाहेब बर्गे यांनी केले तर आभार पवन पाठारे यांनी केले.